Beed News Saam v
महाराष्ट्र

Maratha Aarkshan : बीड जिल्हा बंदची हाक; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक, सरकारच्या निषेधार्थ उद्या बंद

Beed News : मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरून बीड जिल्ह्यात बंदमध्ये सहभागी होणार असून सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरु असून मुंबईत पाच दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. तर मराठा समाज देखील आक्रमक झाला असून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारच्या निषेधार्थ उद्या बीड जिल्हा कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय बंद करण्यात येणार आहे. 

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं; या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करत आहेत. आता काही केले तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली असून राज्यभरातून मराठा समाजाकडून आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे.  ठिकठिकाणी रास्ता रोको. उपोषण केले जात असून काही ठिकाणी बंद देखील पाडण्यात येत आहे. त्यानुसार आता बीड जिल्ह्यात देखील उद्या बंद पाडण्यात येणार आहे. 

बीड जिल्हा उद्या कडकडीत बंद राहणार 

टोकाचे उपोषण करत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय नेत्यांकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत. मराठा समाज बांधवांकडूनही उद्या बीड बंदची हाक देण्यात आली असून उद्या मराठा समाज बांधव या बंदमध्ये रस्त्यावर उतरून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणार आहेत.

परभणीत मुंडन आंदोलन   

परभणी : मराठा आरक्षणासाठी मागच्या ५ दिवसांपासून मुंबईत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत आंदोलन करत असताना सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्य सरकार विरोधात व जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणीच्या मानवत येथील मराठा समाज बांधवांनी मुंडण आंदोलन केले आहे. तहसील कार्यालया बाहेरच हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपरफुटी प्रकरणी एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे, CBI च्या चार्जशीटमध्ये नेमके काय?

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

Nashik: देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT