Maratha Reservation : मराठा बांधव उतरले रस्त्यावर; राहुरीत अडवला महामार्ग, नायगावमध्येही कडकडीत बंद

Ahilyanagar Rahuri News : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठींबा दिला जात असून सरकारने आरक्षणाची मागणी पुर्ण करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

राहुरी (अहिल्यानगर) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्ग अडवत सर्वपक्षीय आंदोलक रस्त्यावर उतरले असून येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आला. तर दुसरीकडे नांदेडच्या नायगावमध्ये कडकडीत बंद पाडण्यात आला आहे.  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करत आहेत. राज्यभरातून आला पाठींबा दिला जात असून मराठा समाज बांधव मुंबईला रवाना होत आहेत. तर आता या आंदोलनाला पाठींबा देत महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आंदोलन तिव्र होताना दिसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठा बांधवांनी आज राहुरी बाजार समितीसमोर नगर- मनमाड महामार्ग अडवत रास्तारोको आंदोलन केले. 

Maratha Reservation
Nanded- Pandharpur Express : नांदेड - पंढरपूर एक्सप्रेसला कळंब रोड स्टेशनवर थांबा; प्रवाशांची होणार सोय

नायगाव शहर कडकडीत बंद
नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज नांदेडच्या नायगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सकाळपासून व्यापाऱ्यांनी शहरातील सर्व प्रतिष्ठान बंद ठेवली आहेत. मराठा समाज बांधवांच्या वतीने रस्त्यावर उतरून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली आहे. 

Maratha Reservation
Parbhani Crime : किरकोळ कारणातून वाद; धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू, एक गंभीर

गौराईच्या समोर साकारण्यात आला मराठा आंदोलनाचा देखावा
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नांदेडच्या कामठा गावातील महेश पाटील तिडके यांनी गौराईच्या समोर आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा देखावा सादर केला आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी दिलेल्या लढ्यातील योगदाचे देखावे देखील या गौराई समोर सादर करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com