Sirsala Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Beed : घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; दोघांवर गुन्हा दाखल

6 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले...

विनोद जिरे

Beed Latest News : घरकूलाची तपासणी करुन तिसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी मोबदला म्हणून 6 हजारांची मागणी करण्यात आली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी हीच मागणी केलेली 6 हजार रुपयांची लाच घेताना बीडच्या (Beed) परळी तालुक्यातील सिरसाळा येथे खाजगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले आहे.

सचिन रावसाहेब डिघोळे (कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पंचायत समिती परळी), व बाळू उर्फ राजू लक्ष्मण किरवले वय 28, रा. भीमनगर, सिरसाळा अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदारास रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते.

या घरकुलाची तपासणी करून तिसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून 6 हजार रुपयांची मागणी करून लाचेची (Bribe) रक्कम खाजगी व्यक्ती बाळू किरवले याच्या मार्फत सिरसाळा येथे स्वीकारली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस (police) ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Thakare : बिग बॉस विजेता शिव ठाकरेने गुपचूप बांधली लग्नगाठ; 'तो' फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गुडन्यूज

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

SCROLL FOR NEXT