Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे पडलं महागात; बीड पोलिसांची दीड महिन्यात १९१ जणांवर कारवाई

Beed News : बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लागल्यापासून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत होत्या. यावर बीड पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे.

विनोद जिरे

बीड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर होती. यात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर लक्ष होते. अशाच वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या १९१ जणांवर मागील दीड महिन्यात पोलिसांनी कारवाई केली आहे. तर याच प्रकरणात जिल्ह्यात १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

बीड (Beed) जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लागल्यापासून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत होत्या. यावर बीड पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून बीड पोलिसांनी ही कारवाईची मोहीम उघडली असून आतापर्यंत तब्बल १९१ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ज्याने सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपहार्य पोस्ट केल्या आहेत, ज्यामधून जातीय, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात; अशा १९१ जणांना नोटीस बजावून पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

२६३ पोस्ट केल्या डिलीट 
दरम्यान आतापर्यंत ३१६ पोस्ट या बीड पोलिसांना (Beed Police) आक्षेपहार्य वाटल्या आहेत. त्या तपासून त्याचे डिटेल्स काढले. त्यापैकी २६३ पोस्ट या सोशल मीडियामधून डिलीट केल्या आहेत. बाकी जवळपास ५० पोस्ट डिलीट करण्याची प्रोसेस सुरू आहे. यातीलच ज्यांनी पोस्ट केल्या, लाईक केले आहे, शेअर केले आहे, त्यापैकी 191 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर आतापर्यंत १६ गुन्हे देखील दाखल झाले असल्याची माहिती (Police) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Tips : १ हफ्त्यात पातळ आयब्रो करा घनदाट आणि जाड ; घरच्या घरी बनवा हे सीरम

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील दरोड्याचे बीड कनेक्शन उघड; पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: अशोक खरातच्या जामिनाला सरकारचा विरोध; ६ लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांची सेशन्स कोर्टात सुनावणी

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

SCROLL FOR NEXT