Beed Zp School Saam tv
महाराष्ट्र

Beed Zp School: नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप; शाळेतील रिक्त पदांचा प्रश्‍न

नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप; शाळेतील रिक्त पदांचा प्रश्‍न

विनोद जिरे

बीड : शिक्षकांची रिक्त पदे भरा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा. या मागणीसाठी बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील पुंडी गावचे नागरीक आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या (ZP School) इमारतीला कुलूप लावून जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही, तोपर्यंत शाळा सुरू करू देणार नाही. असा पवित्रा घेतला आहे. (Tajya Batmya)

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन अवघे ४ दिवस होत नाही. तोपर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या जोपर्यंत भरण्यात येत नाहीत; तोपर्यंत शाळा भरू देणार नाही, असा इशारा पुंडी ग्रामस्थांनी दिला असून शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामूळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.

शिक्षकांची ३ पदे रिक्‍त

पुंडी गावातील पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ३ पदे रिक्त आहेत. यामुळे शाळेत दाखल ८० विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं? असा प्रश्न विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीत सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

बायकोला टीबी, मुलीची फी भरायला पैसे नाही; शिवार हेल्पलाईनवर शेतकऱ्यांचा टाहो, 'या' 5 जिल्ह्यांतून सर्वाधिक कॉल

Rajyasbha Election: भाजपमध्ये मोठा फेरबदल होणार; मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री देणार राजीमाना?

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

SCROLL FOR NEXT