Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Child Marriage : अन्य जिल्ह्यात जाऊन विवाह; बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, वर्षभरात झाले ३०० बालविवाह

Beed News : बीड जिल्ह्यात जितके बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. त्यापेक्षा अधिक बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यासाठी सध्या ही बिकट परिस्थिती आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यात आतापर्यंत या बालविवाहाची आकडेवारीवरून असे लक्षात येत आहे की ही धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जिल्ह्यात मागील वर्षभरात ३०० पेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. तर २५८ बालविवाह थांबवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यात विवाह न झाल्यास अन्य ठिकाणी जाऊन विवाह करत असल्याचे देखील यात समोर आले आहे. 

बालविवाह करण्यास कायद्याने गुन्हा आहे. मात्र कायद्याला न जुमानता अनेकजण मुलांचे कमी वयात विवाह उरकण्याचा तयारीत असतात. अर्थात बीड जिल्ह्यात जितके बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. त्यापेक्षा अधिक बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यासाठी सध्या ही बिकट परिस्थिती आहे. आकडा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. त्यासाठी चिंतेची बाब आहे.

१८ जणांवर गुन्हे दाखल 

बीड जिल्ह्यात या वर्षामध्ये २५८ बालविवाह थांबवले आहेत. तर १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात बालविवाह होताना पाहायला मिळत आहेत. जेवढी जास्त जनजागृती होईल, तेवढ्या तक्रारी जास्त येत आहेत. ज्या मुलींचे बालविवाह झाले आहेत. या मागची मूळ कारणे म्हणजे स्थलांतर, गरिबी, सिंगल कुटुंब ही एक समस्या आहे. नोकरदार चांगला मुलगा आला, तर लग्न लावून दिले जातात. मुलींची संख्या कमी असल्यामुळे पैसे देऊन देखील विवाह करतात. 

अन्य जिल्ह्यात जाऊन करतात विवाह 
दरम्यान बीड जिल्ह्यात पाहायला गेलं तर ग्रामीण भागासह शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक वेळा प्रशासनाकडून आव्हान केलं तरीही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे ही समस्या कमी होण्यासाठी शासन स्तरावर मात्र उपाययोजना केल्या जातात. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात जर विवाह नाही झाला; तर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विवाह होत असल्याचा देखील धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT