2 Youth Died After Lightning Strike Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: धो-धो पावसापासून वाचण्यासाठी निवाऱ्याला गेले अन् घात झाला, वीज कोसळून जीवलग मित्रांचा मृत्यू

2 Youth Died After Lightning Strike: बीडमध्ये गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामध्ये वीज कोसळून २ जीवलग मित्रांचा मृत्यू झाला.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे बीडमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या पावसात अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशामध्ये कामावरून घरी जात असताना अंगावर वीज पडल्यामुळे जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बीडच्या गेवाराई तालुक्यात ही घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामध्ये दोन मित्र कामावरून घराकडे जात होते. दुचाकीवरून घराच्या दिशेने जात असताना अचानक अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाबुराव पिंपळे आणि लहू उद्धव खरात असे मयत तरुणाचे नाव आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात हे दोघे जण कुटुंबीयांसोबत राहत होते.

बाबुराव आणि लहू हे दोघेही बीडमध्ये नोकरी करत होते. नेहमीप्रमाणे ते कामावरून गावाकडे जात असताना वाटेतच मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस येत असल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडली. या घटनेत दोघांचा देखील जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे अर्धमसला गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळीतील संगम येथे मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. याच पावसात काढणीला आलेले सोयाबीन पूर्णतः पाण्यात गेले आहे. गेल्या १५ दिवसांत झालेल्या पावसात देखील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचेच पंचनामे अद्याप झाले नसताना आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर नवं संकट उभे ठाकले आहे. अशात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT