Maratha Aarkshan News:  Saamtv
महाराष्ट्र

Beed News: आधी आरक्षण, मग इलेक्शन.. स्टेटस ठेवत मराठा तरुणाची आत्महत्या; बीडमधील घटना

Maratha Aarkshan News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनात सहभागी असणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणाची मागणी करत व्हाट्सअपला स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

विनोद जिरे

Beed Breaking News:

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनात सहभागी असणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणाची मागणी करत व्हाट्सअपला स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण दिलीप सोनवणे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो बीडच्या आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक गावात राहणारा होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरूण प्रवीण दिलीप सोनवणे हा तरुण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj jarange Patil) याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपस्थित होता. अशातच त्याने आज मोबाईलवर स्टेटस ठेऊन स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जिवन संपविले आहे. त्याच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्टेटसमध्ये काय म्हटलं?

"गरजवंताचा लढा, निष्ठावंताचा लढा, शौर्यवंताचा बहुसंख्य असुनही शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या मराठ्याचं आता "एकचं मिशन आधी मराठा आरक्षण, (Maratha Reservation) मगच इलेक्शन". या राज्याच्या गृहमंत्र्याने आपले मतदान घेऊन निवडून येण्यासाठी दहा टक्के आरक्षणाचे गाजर दिले. परत इलेक्शन झाल की तेच घडणार. मागेही सरकारने केले आहे,"

"आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसीमधून आरक्षण देणे गरजेचे आहे. पण या गृहमंत्र्याला मराठ्याचा एवढा द्वेष आहे. तो मराठ्याना आरक्षण देऊ देणार नाही. आजपर्यंत खूप जणांनी आपले बलिदान दिले आहे. यांना काहीच फरक पडत नाही. आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही असे या स्टेटसमध्ये म्हटले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT