Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : चप्पल घेतली नाही म्हणून १० वर्षीय चिमुकल्याने उचललं टोकाचं पाऊल; मन सुन्न करणारी घटना

मनाला अस्वस्थ वाटेल अशी दुर्दैवी घटना बीडमध्ये उघडकीस आलीय.

विनोद जिरे

Beed Latest News - मनाला अस्वस्थ वाटेल अशी दुर्दैवी घटना बीडमध्ये उघडकीस आलीय. चप्पल घेतली नाही म्हणून ऊसतोड मजुराच्या 10 वर्षीय चिमुकल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आई वडील ऊसतोडणीला गेल्याने आज्जीकडे असतांना त्याने हे टोकाचं पाऊल उचललंय. ही धक्कादायक घटना बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोडखा कासारी येथे घडलीय. (Beed News In Marathi)

आई-वडील ऊसतोडणीसाठी कारखान्यावर गेल्यामुळे मुलगा हा हिंगणी (खु.) येथे आजोळी होता. त्याने आजीकडे नवीन चप्पलची मागणी केली होती. मात्र आजीने सहजच त्यास नकार दिला.

या किरकोळ गोष्टीचा मुलाला राग आला आणि त्याने मी आता आई - वडिलांकडेच जातो म्हणून घरातून निघून गेला आणि या दरम्यान रस्त्यावर असलेल्या एका झाडाला त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. (Latest Marathi News)

तर या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह धारुर ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल करत घटनास्थळाचा पंचनामा केलाय. दरम्यान, या घटनेने गावावर शोककळा पसरली असून लहान मुलाच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Panvel Tourism : तलावाकाठी येईल चौपाटीवर फिरण्याचा फिल, पनवेलजवळील निसर्गरम्य ठिकाण

SCROLL FOR NEXT