Beed news साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

बीडमध्ये खळबळ! राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांचे कार्यालय जाळले; घटना सीसीटीव्हीत कैद

Beed news : बीडच्या वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव जमाले यांचे संपर्क कार्यालय अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री पेटवून दिले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद| बीड प्रतिनिधी| साम टीव्ही मराठी

Beed NCP office fire latest news : बीड जिल्ह्यातील वडवणीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडवणी तालुकाध्यक्ष महादेव जमाले यांचे संपर्क कार्यालय अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री पेटवून दिले. या आगीत कार्यालयातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले आहे. जमाले यांच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकी घटना काय?

वडवणीमधील वसंतराव नाईक चौकात तालुकाध्यक्ष महादेव जमाले यांचे पक्षाचे कार्यालय आहे. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने या कार्यालयाला अचानक आग लावली. मध्यरात्रीच्या वेळी आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले.

अग्निशामक दल आणि स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत कार्यालयातील सर्व महत्त्वाच्या फायली, राजकीय कागदपत्रे आणि फर्निचर पूर्णपणे जळून खाक झाले होते.

पोलीस कारवाई काय झाली?

मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण जाळपोळीची घटना जवळच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील नेमके कारण राजकीय वैमनस्य आहे की अन्य काही, याचा तपास पोलीस करत आहेत.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! बलात्कार प्रकरणात अडकला स्टार खेळाडू, कोर्टाकडून तात्काळ अटक करण्याचे आदेश अन्...

तालुकाध्यक्षांचे कार्यालयच अशा प्रकारे पेटवून दिल्यामुळे वडवणी शहर आणि परिसरात राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

September Rule Changes: दुधापासून ते LPG सिलिंडरपर्यंत... १ सप्टेंबरपासून बदणार हे ९ नियम; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; मनुस्मृती दहनाचा इशारा

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Dhaniya Panjiri Recipe : जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी खास नैवेद्य! 'अशी' बनवा फक्त १० मिनिटांत चविष्ट पंजिरी

SCROLL FOR NEXT