बीडमधून एक थरारक घटना समोर आली आहे. नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील कचरावाडी येथे मोबाईल चार्जरचा स्फोट होऊन एक तरुण यात जखमी झाली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजेंद्र नामदेव वनवे (वय २५) असं जखमी तरुणाचं नाव आहे. सदर तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. ८ मार्च रोजी त्याच्या घरामसमोर काही अज्ञात व्यक्तींनी काळ्या रंगाचा आणि लाल पिन असलेला चार्जर आणून टाकला होता. कृष्णालाही चार्जरची गरज होती. हे काहीतरी नवीन प्राकरचं चार्जर दिसतंय असं म्हणत कृष्णाने तो चार्जर घरात आणला.
तीन बोटं पूर्णत: भाजली
त्याने घरातील एका प्लगला चार्जर लावला आणि फोन चार्जिंग करण्यास सुरूवात केली. चार्जिंगचे बटण ऑन करताच या चार्जरचा स्फोट झाला. या घटनेत तरुणाची तीन बोटं पूर्णत: भाजली आहेत. सदर चार्जरमध्ये डिटोनेटर आणि छर्रे वापरून त्याचं सर्किट तयार आलं होतं.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि दहशतवादविरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दहशतवादविरोधी पथकाचे एपीआय उमेश कदम आणि दहशतवादविरोधी कक्षाचे एपीआय भास्कर नवले यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी डिटोनेटर आणि छर्रे वापरून चार्जरचं सर्किट तयार करण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली. |
आता असा प्रकार कुणी केला असेल? यामागे नेमकं कोण आहे? फक्त कृष्णाच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी कोणी असं केलं असेल का? की हा दहशतवाद्यांचा कट आहे? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित राहिले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.