Beed Maratha Morcha Latest News Saam TV
महाराष्ट्र

Beed Maratha Morcha: बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; मध्यरात्री एसटी बस पेटवली, थरारक VIDEO आला समोर

Beed Maratha Morcha Latest News: बुधवारी रात्री बीडमध्ये काही मराठा आंदोलकांनी गेवराई आगारात एसटी बस पेटवून दिली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

विनोद जिरे

Beed Maratha Morcha Latest News: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागत आहे. बुधवारी रात्री बीडमध्ये काही मराठा आंदोलकांनी गेवराई आगारात एसटी बस पेटवून दिली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

सदरील बस प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगर येथून लातूरच्या अहमदपूर येथे जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान, बस गेवराई आगारात आली असता, काही आंदोलक घोषणाबाजी करत आले. त्यांनी बसमधील (ST Bus) प्रवाशांना खाली उतरवून बस पेटवून दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

बीडमध्ये मराठा समाज आक्रमक

जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Morcha) वतीने बीड जिल्ह्यात चक्काजामची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यात धुळे -सोलापूर महामार्ग, बीड -अहमदनगर, बीड -परळी, माजलगाव -परभणी, कल्याण- विशाखापट्टनम, खामगाव- पंढरपूर, अहमदपूर - पाटोदा या महत्त्वाच्या महामार्गासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावच्या रस्त्यावर देखील चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले आहे.

सकाळी १० वाजेच्या सुमारास या आंदोलनाला सुरूवात झाली असून आंदोलकांनी पाली येथे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला आहे. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. आरक्षणासंदर्भात ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला.

दरम्यान, सकाळी साडेदहा वाजेपासून सुरू झालेलं हे आंदोलन दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. जिल्ह्यात शेकडो ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक साडेदहा ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद असणार असल्याची माहिती बीड आगार नियंत्रक अजय मोरे यांनी दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT