आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे. अशातच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळूंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी बंगल्याच्या पार्किंगला आग लावली. या आगीत सोळंके यांच्या कारसह बंगल्याला देखील आग लागली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बंगल्याला आग
माजलगावमधील मराठा आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी आक्रमक होत सोळंके यांच्या बंगल्याजवळ असलेल्या पार्किंगला आग लावली तेव्हा आगीचे लोट बंगल्यापर्यंत पोहचले. आगीने संपूर्ण बंगल्याला विळखा घातला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.
धुळे महामार्गावर रस्त्यावर टायर जाळून केला निषेध
धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून धाराशिव येथील शिंगोली सर्कीट हाऊस जवळील सोलापूर-धुळे महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, यामुळे वाहणांच्या मोठ्या रांगा लागल्या असून येत्या दोन दिवसांत जर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर यापेक्षा तीव्र आणि उग्र आंदोलन करण्यात इशारा समाज बांधवांनी दिला आहे.
पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात
राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला गेलाय. पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
समितीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सरकार तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.