Majalgaon Gevrai Highway terrible scooty accident  Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Accident : चहा पिऊन परतताना काळाची झडप, भरधाव वाहनाची स्कूटीला धडक; नामांकित डॉक्टरसह एकाचा मृत्यू

Majalgaon Gevrai Highway Accident : डॉ. शरद चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prashant Patil

बीड : माजलगाव - गेवराई महामार्गावर असलेल्या व्यंकटेश मंगल कार्यालयाजवळ चहा पिऊन माजलगावकडे येत असलेल्या स्कूटीला पाठीमागून अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील मस्के हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. शरद नवनाथ चव्हाण (रा. जायकोवाडी तांडा) आणि स्वरूप मस्के हे दोघे रात्री गेवराई रोडवर चहा पिण्यासाठी गेले होते. चहा पिऊन परत येत असताना व्यंकटेश मंगल कार्यालयाजवळ पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिली.

या अपघातात स्वरूप मस्के हे जागीच ठार झाले तर डॉ. शरद चव्हाण हे उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचाही मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली आहे. सदरील अपघात इतका भयानक होता की, धडक दिलेली स्कूटी १५० ते २०० फूट उडून रस्त्याच्या बाजूला फरफटत नेलेली दिसत आहे. डॉ. शरद चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT