Beed: विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार चिमुकल्यांचा जीवावर बेतला विनोद जिरे
महाराष्ट्र

विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार चिमुकल्यांचा जीवावर बेतला

बीड जिल्ह्यात विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार २ चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे.

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यात विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार २ चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे. घराच्या छतावर विजेचा करंट लागून चुलत बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळच्या दरम्यान बीडच्या (Beed) टालेवाडीत घडली आहे. साक्षी भारत बडे (वय-१२) व सार्थक अशोक बडे (वय-८) अशी मयत चिमुकल्याची नावे आहेत. बीडच्या (Beed) माजलगाव (Majalgaon) तालुक्यात असणाऱ्या टालेवाडी येथे, भरत बडे यांच्या घरात खेळत असतांना छतामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने, या २ सख्या चुलत बहिण-भावाचा मृत्यू झाला आहे. घराच्या बाजूला असलेल्या डीपीवरून (DP) गेल्या अनेक वर्षापासून करंट उतरत असल्याच्या घटना वारंवार घडत होते. (Beed Majalgaon Death of 2 child due to shock)

हे देखील पहा-

याबाबत गावातील (village) नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना, वेळोवेळी कळवुन देखील, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याचदरम्यान काल सायंकाळच्या दरम्यान हे दोघे चिमुकली बहिण- भाऊ खेळत असताना, त्यातील सार्थक हा छतावर जाण्यासाठी चढत असताना त्याला शॉक (Shock) लागला असावा व त्यानंतर साक्षी ही त्याला पाहायला गेली असता तिला देखील करंट लागल्याने हे दोघे एकमेकांच्या अंगावर पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या दोघांवर रात्री ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले असून या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान विद्युत वितरण कंपनीच्या (MSEDCL) गलथान कारभारामुळे अनेक गावातील विद्युत वाहक डीपीमधून, करंट उतरत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. यातच अनेक दिवसापासून विद्युत पोल आणि तारेच्या तुटण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने तात्काळ लोंबकळणाऱ्या ताराची व डिपीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान यासंदर्भात महावितरणचे अधिकारी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

SCROLL FOR NEXT