Mahadev Munde Killed case SaamTV
महाराष्ट्र

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरण; हत्येला दीड वर्षे, अद्याप निकाल नाही, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मोठा निर्णय

Beed Mahadev Munde Murder Case : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता महादेव मुंडे हत्या प्रकरणाला नव्याने तोडं फुटले आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार आहेत.

Prashant Patil

बीड : बीडच्या परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार आहेत. पोलीस उपाधीक्षकांकडे तपास देऊन अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.

२१ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला जवळपास दीड वर्ष होत असताना देखील यातील आरोपी अटकेत नाहीत. हे प्रकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा समोर आणले आहे. त्यानंतर या प्रकरणाची फाईल रीओपन करून याचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला. या अनुषंगाने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी १५ दिवसांपूर्वी पोलीस उपाधीक्षकांची भेट घेतली. मात्र, या प्रकरणात कोणतीही कार्यवाही न झाल्याने ज्ञानेश्वरी मुंडे आज पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. या प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडी कडे दिला जावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलीय.

दरम्यान, मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा गदारोळ सुरु असतानाच महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास हा एसआयटी किंवा सीआयडीच्या मार्फत व्हावा, अशी मागणी मुंडेंच्या कुटुंबियांनी केलीये. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आहे.

महादेव मुंडे यांचे कुटुंबीय चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडून तपास सुरू आहे. तपासावर आपण समाधानी असल्याचे देशमुख कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. तपास अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत होते, त्यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketaki Chitale: मराठी बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार आहेत का?, केतकी चितळेचे वादग्रस्त विधान; VIDEO व्हायरल

IPL खेळण्यासाठी आला अन् हॉटेलमध्ये बोलावलं, लैंगिक शोषण करत..; क्रिकेटपटूवर जयपूरमध्येही गुन्हा

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये

Bhandara Rain : भंडारा जिल्ह्याला रेड अर्लट , शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Maharashtra Live News Update: आज वाशिम बाजार समिती राहणार बंद, अडत्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकले

SCROLL FOR NEXT