मोबाइलचा धसका! इंदुरीकर महाराजांनी केली व्हिडिओ चित्रीत करण्यास मनाई  Saam Tv
महाराष्ट्र

मोबाइलचा धसका! इंदुरीकर महाराजांनी केली व्हिडिओ चित्रीत करण्यास मनाई

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना मोबाइल क्लिपचा चांगलाच धसका घेतला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड: कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना मोबइल (Mobile) क्लिपचा चांगलाच धसका घेतला जात आहे. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या एका कीर्तनाच्या दरम्यान उपस्थित असलेल्यांना मोबाइल बंद करण्यास सांगितले आहे. आता त्याचाच व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्युबवर टाकून अनेक जण पैसे कमवत आहेत. आणि त्यांच्यामुळे आपल्याविरोधात तक्रारी दाखल झाल्याचे वक्तव्य इंदूरीकर महाराज यांनी केले होते. व्हिडिओ (Video) रेकोर्ड करत त्याची कमाई करणाऱ्यांची मुले दिव्यांग म्हणून जन्माला येणार आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.

हे देखील पहा-

इंदूरीकर महाराज यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यावर त्यांनी आता मोबाइलचा धसका घेतला आहे. मंगळवारी, बीड (Beed) जिल्ह्यात धारूर तालुक्यामधील कासारी बोडखा गावामध्ये (village) इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन होते. या कीर्तन सोहळ्यामध्ये इंदूरीकर महाराज यांनी उपस्थित असलेल्या लहान मुलांबरोबर आपल्या शैलीत संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलांना शाळा सुरू झाली का? ऑनलाइन (Online) शिक्षण चांगले जात आहे का? इत्यादी प्रश्न विचारले होते. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असताना मोबाइलवर गाणी ऐकली, असा प्रश्न विचारला. यावर मुलांनी गाणी ऐकली असे जोरात उत्तर दिले.

ऑनलाइन शिक्षणाविषयी आपण हेच बोललो असतो तर लोकांनी टीका केली असती असे इंदूरीकर महाराजांनी यावेळी सांगितले आहे. इंदूरीकर महाराज यांच्या कीतर्नाचे काही जणांकडून मोबाइलवर चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी त्यांचे लक्ष या मोबाइलधारक तरुणांकडे गेले. यानंतर इंदूरीकर महाराज यांनी मोबाइल बंद करण्यास सांगितले आहे. इंदूरीकर महाराजांच्या आवाहनानंतर आयोजकांनी मोबाइल बंद करण्याचे आवाहन उपस्थितांना यावेळी केले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT