ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Babanrao Taywade Statement On OBC: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बाबनराव तायवाडे यांनी ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं स्पष्ट केलं. ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं ते म्हणाले.

राजकीय नेत्यांमध्ये माझ्यापेक्षा कोण लहान आणि कोण मोठा नेहमी असते. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लढाई सुरू आहे. प्रत्येक राजकीय नेता आंदोलन करत आहे. लाखो लोकांचे मोर्चे काढत आहे. समाज रस्त्यावर आल्यावर समाजाला काय मिळणार आहे का? जी मागणी करत आहे ती पूर्ण होणार आहे का? याचा बारकाईने अभ्यास व्हायला पाहिजे.

या ओबीसी समाजामध्ये 400 जाती आहेत, अनेक नेत्यांमध्ये एखाद्या बाबतीत मतभेद असू शकतात मनभेद नाही... आता मनभेद सुरू होतील असा दिसत आहे कारण एकमेकांचे पितळ उघड करण्याचं काम कालच्या मेळाव्यातून दिसून आलं....

मीच ओबीसींच्या वाली हा दाखवण्याचा प्रयत्न मेळाव्यातून दिसून आला... जुन्या काही गोष्टी उकरून काढायच्या आणि त्याच्या आधारे पोल उघडायचे.

कोणी कोणाच्या विचार पटावर जायचं हा त्यांचा प्रश्न असतो... राजकीय मेळावे वेगळे असू शकतात ते एकमेकांच्या डायसवर जाणार नाही..हे जगजाहीर आहे... पण सामाजिक मेळावे आपण घेतो... त्यामध्ये सगळेच पक्षाचे नेते काल मंचावर दिसून आले. सर्वांनी दुसऱ्या नेत्यावर टीका करणे या मताशी मी सहमत नाही.

एखाद्या व्यक्तीची चूक होते ते एकमेकांनी सांभाळून घ्यायला पाहिजे.. प्रमाणे समाजाच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. असे बबनराव तायवाडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com