5 वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा खतरनाक हल्ला; 100 टाके घालायला लागले दीड तास

घराबाहेर खेळणाऱ्या ५ वर्षांच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केला आहे.
5 वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा खतरनाक हल्ला; 100 टाके घालायला लागले दीड तास
5 वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा खतरनाक हल्ला; 100 टाके घालायला लागले दीड तासSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: घराबाहेर खेळणाऱ्या ५ वर्षांच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केला आहे. २०-२५ सेकंदांसाठी निष्पापाच्या चेहऱ्यावर वाईट रीतीने चावा घेतला आहे. नाकाचे हाड देखील तोडून कुत्र्याने (dog) चघळले होते. मुलाने आरडा- ओरडा केल्यामुळे घरच्यांनी (family) बाहेर येऊन त्याला कुत्र्यापासून वाचवले आहे. त्याला दवाखान्यामध्ये (hospital) लगेच हलविण्यात आले आहे. तेथे डॉक्टरांनी सुमारे दीड तास शस्त्रक्रिया (Surgery) केली आहे. या मुलाच्या चेहऱ्याला १०० टाके पडले होते. मुलाच्या चेहऱ्याच्या आणि डोक्याच्या काही भागामधून त्वचा निघाली होती. डोळे, नाक, ओठ शिवून घ्यावे लागले आहे. त्यांची अवस्था बघून डॉक्टर देखील हादरले होते. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी आयुष्यामध्ये असा प्रसंग बघितला नव्हता. (Dangerous dog attack on 5 year old boy)

हे देखील पहा-

मात्र, आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. भिलवाडा येथील मंडल भागात कालुखेडा गावामध्ये राहणारा गोपाल गुर्जर यांचा ५ वर्षांचा मुलगा प्रल्हाद गुर्जर सोमवारी संध्याकाळी मुलांबरोबर खेळत होता. तेव्हा एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला आहे. कुत्र्याने मुलाला रस्त्यावर पाडले आणि त्याच्या तोंडाला चावा घेतला आहे. आरडा- ओरडा ऐकून कुटुंबीय बाहेर आले असता मुलाचे रक्त बघून ते थक्क झाले होते. कुत्र्यापासून सुटका करून घेतल्यानवर मेजाने त्याला रुग्णालयात नेले आहे. त्यावर प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना भिलवाडा येथे रेफर करण्यात आले आहे.

5 वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा खतरनाक हल्ला; 100 टाके घालायला लागले दीड तास
Russia-ukraine War: युक्रेन संकटाविषयी PM मोदींची नेदरलँडच्या पंतप्रधानांशी चर्चा

एका खाजगी रुग्णालयात ईएनटी तज्ज्ञ डॉ. राजेश जैन यांनी प्रल्हादवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ईएनटी तज्ज्ञ डॉ. राजेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार की, केस खूपच आव्हानात्मक होती. अशी केस मी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिली आहे. मुलाची संपूर्ण त्वचा कुत्र्याने चावली होती. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे मुलाचा चेहरा खूपच खराब झाला होता. कुत्र्याने मुलाच्या संपूर्ण नाकाची त्वचा आणि हाड चावले होते. यामुळे चेहऱ्याचा आकार बदलला होता. रुग्णालयात पोहोचल्यावर मुलाला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये हलविण्यात आले आहे. सुमारे दीड तास ही शस्त्रक्रिया झाली. नाकाची संपूर्ण त्वचा निघून गेली होती.

यावर त्वचा परत ठेवणे खूप कठीण आहे. डोक्याची कातडी फिरवून कपाळावर घेतली आहे. नाकाच्या पुढील त्वचेची संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली आहे. ज्यामध्ये सुमारे १०० टाके घालण्यात आले आहे. नाकाला मूळ आकारामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जैन यांनी सांगितले आहे की, आतापर्यंत कुत्रे हात- पाय चावतात असे दिसून आले आहे. मात्र, एवढ्या लहान मुलाला चेहऱ्यावर चावल्याने मुलाला असह्य वेदना होत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com