Beed : अंबाजोगाई तालुक्यात मांजरा नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहून..! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : अंबाजोगाई तालुक्यात मांजरा नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहून..!

सोयाबीन काढत असताना त्याला पाण्याच्या प्रवाहाने ओढून घेतले आणि भावाच्या डोळ्यासमोर राम वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बिपीन पाटील हे तडोळा परिसरात दाखल झाले असून नदीच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या रामचा शोध सुरु आहे.

विनोद जिरे

बीड : मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने, मांजरा नदीला आलेल्या पुरात, सोयाबीन काढणीसाठी शेतात गेलेला तरुण शेतकरी वाहून गेला आहे. ही घटना आज अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथे घडली आहे.

हे देखील पहा :

राम बाबासाहेब कदम (वय 31, रा. तडोळा) असे पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राम त्याच्या चुलत भावासोबत शेतात गेला होता. रामचे शेत मांजरा नदीकाठी आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने मांजरा नदीला सध्या पूर आलेला आहे. त्यामुळे नदीचे पाणी रामच्या शेतात घुसून सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. डोळ्यादेखत पिकाचे नुकसान दिसत असल्याने राम शक्य होईल तेवढे काठावरचे सोयाबीन काढण्याच्या प्रयत्नात होता.

सोयाबीन काढत असताना त्याला पाण्याच्या प्रवाहाने ओढून घेतले आणि भावाच्या डोळ्यासमोर राम वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बिपीन पाटील हे तडोळा परिसरात दाखल झाले असून नदीच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या रामचा शोध सुरु आहे. दरम्यान आपलं पीक वाचवतांना राम वाहून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT