Beed Crime News, Beed Latest Marathi News
Beed Crime News, Beed Latest Marathi News Saam tv
महाराष्ट्र

बीड अवैध गर्भपात प्रकरण: एजंट महिलेच्या बंगल्यात सापडलं गर्भपाताचं साहित्य, सोनोग्राफीचं जेल

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: अवैध गर्भपाताने बीड जिल्हा (Beed) पुन्हा एकदा डागाळला आहे. पोलीस आणि आरोग्य प्रशासनाकडून संशयितांच्या घरावर छापमारी सुरू आहे. काल रात्री अवैध गर्भपात प्रकरणात ताब्यात घेतलेल्या, महिला एजंट मनीषा सानपच्या गेवराई (Georai) शहरातील आलिशान बंगल्यावर छापेमारी (Raid) करण्यात आलीय. यावेळी तिच्या बंगल्यात गर्भपात (Abortion) करण्यासाठी लागणारं साहित्य, त्याचबरोबर सोनोग्राफी करण्यासाठी लागणारं जेल यासह इतर साहित्य देखील सापडलं आहे. (Beed Latest Marathi News)

मृत शीतल गाडेचं देखील गर्भलिंग निदान (Gender Detection) याचं बंगल्यात करण्यात आलं होत. तर यासाठी 45 ते 50 हजार रुपये घेतले जात होते, अशी माहिती बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिलीय. (Beed Illegal Abortion Case)

हे देखील पाहा -

विशेष म्हणजे मृत महीलेचा गर्भपात हा तिच्या शेतातील एका गोठयात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळं काल दिवसभर गेवराई डेरेदाखल असणारं आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन आज बक्करवाडी येथील गर्भपात केलेल्या गोठ्याची पहाणी करणार आहेत. त्यामुळं आता या ठिकाणी काय सापडणार ? हा गर्भपात कोणी केला ? सोनोग्राफी नेमकी कोणी केली ? यामध्ये कोण डॉक्टर सहभागी आहेत का ? याचा तपास सुरू असून याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Perfect Apple : बाहेरून मस्त दिसणारा सफरचंद आतून खराब निघतो; वाचा गोड आणि टेस्टी Apple ओळखण्याच्या टिप्स

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT