Beed Gevrai father killed himself due to lack of money for children’s education 
महाराष्ट्र

Beed : मुलांच्या शिक्षणासाठी खिशात दमडीपण नाही, मराठा बांधवाने उचलले टोकाचे पाऊल, बीडमध्ये हळहळ

Beed Gevrai father killed himself due to lack of money for children education : बीड जिल्ह्यातील आम्ला येथील एका व्यक्तीने आर्थिक तंगीमुळे आत्महत्या केली; मागे २ मुले व आई राहिले आहे. स्थानिक समुदाय व प्रशासनाने तातडीने मदत सुरु केली पाहिजे.

Namdeo Kumbhar

  • गेवराई (आम्ला), बीड मधील अंकुश बावणे यांनी आत्महत्या केली

  • सुसाईड नोटमध्ये आर्थिक असमर्थता नमूद.

  • बावणे यांच्या मागे दोन मुलं, एक मुलगी आणि आई आहे

  • घटना मराठवाड्यातील मोठ्या सामाजिक-आर्थिक संदर्भात घडली आहे

Maratha community reaction to suicide in Beed Amla : मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे बीडमधील एका मराठा बांधवाने आयुष्याचा दोर कापला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या केली. गेवराई तालुक्यातील आम्ला येथील अंकुश बावणे या मराठा बांधवाने पैसे नसल्यामुळे आयुष्य संपवलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर गेवराई आणि बीडमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आम्ला येथील अंकुश बावणे नावाच्या मराठा व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी माझ्याकडे आता पैसे नाहीत, असे म्हणत त्यांनी आयुष्याचा शेवट केला. त्यांनी सुसाईड नोटही लिहिली आहे. मुलांनो, तुम्हाला शिक्षणाला खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि विकायला देखील काहीच नाही अशी सुसाईड नोट बावणे यांनी लिहिलेली आहे. बावणे यांच्या पश्चात 2 मुलं, 1 मुलगी आणि आई असा परिवार आहे.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. सरकारकडून आरक्षणासाठी पावले उचलण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यात कुणबी दाखले दिले जात आहेत. हे सर्व सुरू असतानाच बीडमध्ये मराठा बांधवाने आत्महत्या केली. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी आयुष्याचा दोर कापला. या घटनेनंतर गेवराई, बीडमध्ये शोकाचे वातावरण आहे. बावणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्या करणं हा पर्याय नाही. मराठ्यांनी अथवा इतर कुणीच आत्महत्या कऱण्याचा निर्णय घेऊ नये. आपल्यामागे बायका-पोरं पोरकी होतात. त्यांनी कुणाकडे पाहायचे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT