Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड हादरलं! शेजारच्यांच्या जाचाला कंटाळली, नवविवाहितेने अंगावर डिझेल टाकून पेटवून घेतलं

Beed Police: बीडमध्ये नवविवाहितेने शेजारच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने अंगावर डिझेल टाकून पेटवून घेतलं. या घटनेत महिला ८० टक्के भाजली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये शेजारच्यांच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराईतील सावता नगरमध्ये ही घटना घडली. अंगावर डिझेल ओतून या महिलेने स्वत:ला पेटवून घेतलं. या घटनेत महिला ८० टक्के भाजली. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील सावतानगर भागामध्ये ही घटना घडली. आमच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये गटाराचे पाणी का सोडता? या कारणावरून पीडित महिला आणि शेजारच्यांमध्ये सतत भांडण होत होते. शेजारी राहणारे या महिलेसोबत सतत भांडण करत तिला जीवे मारण्याची धमकी देत होते. याच त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.

शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून नवविवाहित स्वाती पारखे या महिलेने अंगावरती डिझेल टाकून स्वतःला पेटवून घेतलं. या घटनेत पीडित महिला ८० टक्के भाजली असून तिच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 'माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असा जबाब या महिलेने पोलिसांना दिला आहे.

याप्रकरणी विष्णू घोडके, कमलबाई घोडके, सखुबाई मस्के, भीमराव दाभाडे, नंदा मस्के, मंगल मस्के, सुनीता मस्के, कैलास मस्के, राहुल मस्के, द्वारकाबाई मस्के आणि कांताबाई टाक या सर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT