Laxman Hake News  saam tv
महाराष्ट्र

Beed : बीड पुन्हा तापलं, गेवराईत जोरदार राडा, लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा दाखल

Beed Gevrai Clash News: गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दगडफेक, चपला फेक आणि दांडके दाखवण्याच्या प्रकारानंतर पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

  • गेवराई चौकात लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा

  • चपला फेक, दगडफेक आणि दांडके दाखवण्याचे प्रकार

  • पोलिसांनी तत्काळ कारवाई करून १४ जणांवर गुन्हा दाखल

  • लक्ष्मण हाके यांच्यावरही गुन्हा दाखल; राजकीय तापमान वाढले

Beed Crime News Update : बीड पुन्हा एकदा तापले आहे. गेवराईमध्ये लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्त्ये सोमवारी एकमेकांना भिडले. दिवसभर गेवराईत जोरदार राडा झाला. शहरात दगडफेकीचीही घटना झाली. या राड्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बीडमधील गेवराईमध्ये सोमवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांमध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राडा झाला होता. लक्ष्मण हाके यांच्या अंगावर आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून चपला फिरकवण्यात आल्या होत्या तर लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांकडून गाडीवरती उभारून दांडके दाखवण्यात आले होते. त्यानंतर आज पोलिसांनी सुमोटोनुसार 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचाही सहभाग आहे.

लक्ष्मण हाके यांनी गेवराईमध्ये येऊन दंड थोपटले. त्यांच्या समर्थकांकडून दांडके दाखवण्यात आले. यानंतर आम्हीही गप्प बसणार का? पोलिसांनी बाघ्याची भूमिका घेतली, आम्ही आमदार विजयसिंह पंडित यांच्यासोबत आहोत. गेवराईमधील धनगर समाजदेखील विजयसिंह पंडित यांच्यासोबत आहे. लक्ष्मण हाके यांना ओपन चॅलेंज आहे की, तुम्ही उद्या गेवराई मध्ये या तुम्हाला मी दाखवतो, असे एका प्रत्यक्षदर्शींनी साम टीव्हीसोबत बोलताना सांगितले.

बीडच्या गेवराई तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती चपला आणि दगडफेक करण्यात आली तर लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांकडून देखील दांडके दाखवण्यात आले. राड्यानंतर पोलीस अधिक्षकांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिले. पोलिसांनी त्यानंतर १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटना; पोलिसांकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

APP Leader Shot Dead: लग्न समारंभात गोळीबार; डान्स करणाऱ्या सरपंचाच्या डोक्यावर झाडल्या गोळ्या, १२ दिवसात ३ नेत्यांची हत्या

Narhari Zirwal: नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन समोर, लाच घेतानाच्या VIDEO ने उडवली खळबळ

राज्यसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, नातू-आजोबा सोबत राज्यसभेवर जाणार?

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी 14 बैठका, बड्या नेत्याचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT