खळबळजनक : व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून साडेसात लाखांची रोकड पळवली! SaamTvNews
महाराष्ट्र

खळबळजनक : व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून साडेसात लाखांची रोकड पळवली!

बीडच्या गेवराईमध्ये एका व्यापाऱ्याच्या स्विफ्ट कारची काच फोडून, गाडीतील साडेसात लाख रुपये रोकड असलेली बॅग, अज्ञात चोरट्यांनी पळवलीय.

विनोद जिरे

बीड : बीडच्या गेवराईमध्ये एका व्यापाऱ्याच्या स्विफ्ट कारची काच फोडून, गाडीतील साडेसात लाख रुपये रोकड असलेली बॅग, अज्ञात चोरट्यांनी पळवलीय. हि घटना गेवराई शहरातील सेवालाल नगर भागात, आज घडलीय. तर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने गेवराई (Georai) शहरात मोठी खळबळ उडाली आहे. भीमराव नरुटे रा. तरटेवाडी ता. गेवराई असं व्यापारी फिर्यादीचे नाव आहे.

हे देखील पहा :

भीमराव नरुटे हे गेवराई शहरातील सेवालाल नगर भागातील आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. यादरम्यान त्यांनी स्विफ्ट डिझायर क्र. MH 23 BC9977 या आपल्या कारमध्ये (Car) साडेसात लाख रुपयांची रोकड असलेली बॅग ठेवली होती. तर भीमराव हे नातेवाईकांच्या घरात गेल्याचं लक्षात येताच, अज्ञात चोरट्याने (Thief) गाडीची काच फोडून पैशाची बॅग पळवलीय.

तर, हा प्रकार दिवसा घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळावर गेवराई पोलिसांनी (Police) धाव घेतली होती. तर पोलिसांकडून पाहणी करत श्वानपथकास पाचारण केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गेवराई पोलिस ठाण्यात सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT