बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडितांच्या समर्थकांमध्ये हा तुफान राडा झाला.. त्यानंतर हाकेंनी पंडितांच्या राजीनाम्याची मागणी करून पंडितांचा थेट पापड्या असा उल्लेख केलाय तर विजयसिंह पंडितांनीही हाकेंना स्ट्रीट डॉग म्हटलंय...
मात्र या संघर्षाची ठिणगी पडली ते आमदार विजयसिंह पंडितांनी जरांगेंच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवरुन... हाच बॅनर लक्ष्मण हाकेंना खटकला आणि वादाचा भडका उडाला...
आमदार विजयसिंह पंडितांनी मनोज जरांगेंना पाठिंबा देत मतदारसंघात चलो मुंबईचे बॅनर लावले. त्यानंतर ओबीसी बैठकीतून हाकेंनी विजयसिंह पंडितांवर आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर हाकेंच्या विधानाचा निषेध करत पंडितांच्या कार्यकर्त्यांनी हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. दरम्यान पंडित यांना आव्हान देत हाके गेवराईत पोहचले आणि पंडित आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आले.. चिडललेल्या पंडितांच्या समर्थकांनी हाकेंच्या वाहनावर दगडफेक करत, चप्पल फेकली. आणि हाकेंच्या कार्यकर्त्यांनीही हातात दांडके घेत पंडितांच्या कार्यकर्त्यांना प्रतिआव्हान दिलं... त्यातून संघर्ष आणखीच टोकाला गेला..
दरम्यान गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे आमदार विजयसिंह पंडित यांच्या 8 समर्थकांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेंना गेवराईत पाय ठेऊ देणार नाही, असाच थेट इशारा दिलाय...
करण्यात आलेली विधानं पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न निर्माण होतोय. नेत्यांकडूनच डुक्कर, कुत्रे अशा पद्धतीनं एकमेकांवर खालच्या पातळीची टीका केली जात असेल. तर कधीकाळी राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत असणाऱ्या महाराष्ट्राचं राजकारण नेमकं चाललंय तरी कुठल्या दिशेने ...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.