बीड: 'त्या' बालविवाहितेवर बलात्कार प्रकरणी आणखी चौघे अटकेत
बीड: 'त्या' बालविवाहितेवर बलात्कार प्रकरणी आणखी चौघे अटकेत Saam Tv News
महाराष्ट्र

बीड: 'त्या' बालविवाहितेवर बलात्कार प्रकरणी आणखी चौघे अटकेत

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीडच्या अंबाजोगाईत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत साम टिव्हीने बातमी दाखवली होती. या साम टीव्हीच्या बातमीनंतर आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे. काल पीडितेचा पुरवणी जबाब इनकॅमेरा घेण्यात आला आहे. यावेळी पीडितेने अत्याचार करणाऱ्या काही लोकांची नावे तर काहींचे वर्णन व घटनास्थळाची सविस्तर माहिती दिली आहे. यात तिने दोन पोलिसांचाही उल्लेख केला आहे . त्यापैकी एकाने हॉटेलवर नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने तिला स्वतःच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक दावा तिने केला.

त्यानंतर आता पोलिसांनी तपासाला वेग दिला असून या प्रकरणात पिडीतेच्या पित्यासह 3 जणांना अगोदरचं ताब्यात घेतले होते. मात्र रात्री पुन्हा 4 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर अंबाजोगाई शहरातील मुख्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे.

रुग्णालयातील काहींनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे बोलले जाते आहे!

गेल्या 6 महिन्याच्या कालखंडात सदरील पिडीतेने अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात तब्बल 32 वेळा उपचार घेतल्याची नोंद पोलीसांना सापडली आहे. या दरम्यानही रुग्णालयातील काहींनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळं पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत. दरम्यान साम टीव्हीने हा सर्व प्रकार दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पोलिसांकडून तपासाला वेग दिला जात असून या पीडितेला न्याय द्यावा. अशी मागणी आता सर्व स्तरातून होताना दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

Mobile Hack: फोन पाण्यात पडला तर, चुकूनही करु नका हे काम,नाहीतर होईल नुकसान

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

SCROLL FOR NEXT