beed crime x
महाराष्ट्र

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Crime News : बीडच्या लुखामसला येथील माजी उपसरपंच यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका नर्तिकेचे नाव समोर आले आहे. तर नातेवाईकांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

Yash Shirke

  • बीडच्या माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू.

  • नर्तिका पूजा गायकवाडचे नाव फिर्यादीत नमूद.

  • नातेवाईकांचा दावा – आत्महत्या नसून घातपात.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंचाने स्वत:ला गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. उपसरपंचाच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली आहे. नर्तिका पूजा गायकवाडने उपसरपंचाचा बळी घेतल्याचे म्हणत नातेवाईकांनी फिर्यादीत पूजाचे आरोपी म्हणून नाव नमूद केले आहे.

गोविंद बर्गे हे लुखामसला गावचे माजी उपसरपंच होते. ते गुत्तेदारीचे काम पाहत होते. त्याचबरोबर बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. ते गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे.

गोविंद बर्गे यांचा जीव नर्तिका पूजा गायकवाडमुळे गेल्याचा आरोप बर्गे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गेवराईमधील बंगला नावावर करुन दे, भावाच्या नावावर शेती करुन दे नाहीतर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी पूजाने गोविंद बर्गे यांना दिली होती. पूजाने अनेकदा पैश्यांसह प्राॅपर्टीची मागणी देखील केली होती, अशी माहिती फिर्यादीमध्ये आहे.

नर्तिका पूजा गायकवाडच्या वाढणाऱ्या अपेक्षा आणि त्यानंतर थेट बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करुन तुला केसमध्ये गुंतवेन या धमकीमुळे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. गोविंद बर्गे यांच्याकडे कधीही पिस्टल नव्हते, ते कधी साधी काठीही सोबत घेऊन फिरत नसत. मग त्यांनी गोळी कशी-काय घालून घेतली असा सवाल नातेवाईकांनी केला आहे. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा बर्गे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav Kapur News: ७ वर्षाने लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गौरव, कोण आहे ही तरूणी?

Shubh Shravani: झी मराठीवर लवकरच येणार नवी मालिका; 'हा' अभिनेता ९ वर्षांनी करणार कमबॅक

Mahayuti politics : महापालिका निवडणुकीसाठी 4 + 4 सूत्र, महायुतीचा नेमका प्लान काय?

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

BMC Housing Lottery: मुंबई महापालिकेच्या ४२६ घरांसाठी सोडत निघणार; या दिवशी लागणार लॉटरी

SCROLL FOR NEXT