Beed Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident News: बीडमध्ये कंटेनर- पिकअपचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

Beed News: बीडच्या मांजरसुंबा - पाटोदा महामार्गावर कंटेनर व पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत.

विनोद जिरे

Beed Accident News:

बीडच्या मांजरसुंबा - पाटोदा महामार्गावर कंटेनर व पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप असे पीकअप मधील मयतांची नावे आहेत.

कंटेनरमधील चालकासह अन्य 1 जण ठार झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता, की अपघातानंतर कंटेनरमधील लोखंडी पाईप रस्त्यावर पसरल्याने वाहतुकी खोळंबली होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या घटनेने महाजनवाडीसह वाघीरा गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

नांदेडमध्ये भरधाव वाहनाच्या भीषण अपघात 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

दरम्यान, नांदेडमध्येही एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्या या 2 विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे.

नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत संकेत पाशेमवाड (17) आणि वैभव येळने (18) दोन विदयार्थी ठार झाले. नांदेड-भोकर मार्गावरील भोसी गावाच्या महामार्गावरून हे दोन्ही विद्यार्थी चालत जात होते. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले, यात त्यांचा मृत्यू झाला. भोकर पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : फैय्याजला मुंबईतील ३० हजार नागरिकांना का मारायचं होतं? चौकशीदरम्यान सांगितलं खरं कारण

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर

Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 9300 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

SCROLL FOR NEXT