BEED TEACHER RECRUITMENT SCAM saam tv
महाराष्ट्र

73 शिक्षकांची हकालपट्टी; आणखी 2,217 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Beed Teacher Recruitment Scam: बीडमधील कथित बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 73 शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात आली असून आणखी 2,217 शिक्षकांच्या नियुक्त्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड : जिल्ह्यातील शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. बोगस पद्धतीने नियुक्ती मिळवलेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात आल्याचा दावा तक्रारदार सादेक इनामदार यांनी केला आहे. तसेच, बोगस पदांची निर्मिती करून भरती झालेल्या आणखी 2,217 शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात 2012 पासून शिक्षक भरती बंद असतानाही काही ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या निर्देशांचा सोयीस्कर अर्थ लावून या नियुक्त्या करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी संचमान्यतेमध्ये दुरुस्ती करण्याच्या नावाखाली शिक्षकांची पदे वाढवण्यात आली, तर काही ठिकाणी बनावट विद्यार्थ्यांची संख्या दाखवून संचमान्यतेतील पदसंख्या वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचाही वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी या कथित बोगस शिक्षक भरतीप्रकरणी एसआयटीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने 73 शिक्षकांची सेवा समाप्त केल्याचा दावा इनामदार यांनी केला आहे.

आणखी 2,217 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार?

73 शिक्षकांवर कारवाई झाल्यानंतर आता आणखी 2,217 शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बोगस पदांची निर्मिती करून या शिक्षकांची भरती करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकांवरही कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सादेक इनामदार यांनी सांगितले. त्यामुळे बीडमधील शिक्षक भरती प्रकरणात आगामी काळात आणखी कोणती कारवाई होते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.. विखे पाटलांचा राजीनामा आणि मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी

Indian Railways Ticket : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट बुकिंगचा नियम बदलला, वाचा संपूर्ण प्रोसेस

Indian Railways : देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन स्टेशनदरम्यान धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली नवी अपडेट

काँग्रेसची जोरदार मुसंडी, झेडपी-पंचायत समिती निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव; किती जिल्ह्यांत सत्ता?

बीडमध्ये कार आणि जीपची समोरासमोर धडक; इंजिन 100 फूट लांब उडून पेट्रोल पंपाजवळ पडलं; Photos

SCROLL FOR NEXT