Beed Latest Crime News Saam
महाराष्ट्र

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

Beed Latest Crime News: गेवराई उपसरपंच गोविंद बरगे यांचा मृतदेह कारमध्ये सापडला. डोक्याला गोळी लागली असून, कारमध्ये पिस्तूल सापडलं.

Bhagyashree Kamble

  • गेवराई उपसरपंच गोविंद बरगे यांचा मृतदेह कारमध्ये सापडला.

  • डोक्याला गोळी लागली असून, कारमध्ये पिस्तूल सापडलं.

  • आत्महत्या की हत्या यावर संशय निर्माण झाला आहे.

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच गेवराईमधील एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लुखामसला येथील उपसरपंच यांची हत्या करण्यात आली आहे. गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्या आहे की हत्या? याचे कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

गोविंद जगन्नाथ बरगे (वय वर्ष ३८) (गेवराई, लुखामसला गाव) असे मृत उपसरपंच यांचे नाव आहे. सोमवारी बरगे खासगी कामानिमित्त सोलापुरातील बार्शीमध्ये गेले होते. याठिकाणी ते चारचाकी वाहनाने गेले होते. मात्र, मंगळवारी सकाळी सासुरे गावातील शिवारात कारमध्येच त्यांचा मृतदेह आढळला. यामुळे गावात काहीवेळ खळबळ उडाली.

या घटनेची माहिती तातडीने स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता गोविंद बरगे यांच्या डोक्याला गोळी लागली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची कार तपासली असता, त्यांच्या कारमध्ये पिस्तूल निदर्शनास आली. बरगे यांनी आत्महत्या केली? की त्यांची हत्या करण्यात आली आहे का? याचे कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे बरगे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Reduce Cholesterol: फक्त 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात लगेच करा हे 4 बदल

मनसेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: राज ठाकरे 28 आणि 29 या दोन दिवसाच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर

Famous Actor Death : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Shengdana Chutney Recipe : हिवाळ्यात गरमागरम भाकरीसोबत हवीच शेंगदाण्याची चमचमीत चटणी, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT