बीड - एचआयव्ही बाधित रुग्णांना वेळेवर गोळ्या आणि औषधी मिळतं नसल्यान आम्ही जगायचं कस? असा प्रश्न एचआयव्ही (HIV) बाधित रुग्ण विचारत आहेस. बीडच्या (Beed) जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये मागील काही महिन्यांपासून, एचआयव्ही बाधित रुग्णांना लागणाऱ्या औषधी उपलब्ध नाहीत, असा आरोप (Allegations) रुग्ण करत आहेत. यामुळे जीवघेण्या आजारसोबत दोन हात करावे कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर वेळेवर औषध देत आहोत, रुग्णालयात रूग्ण येत नाहीत, अस उत्तर वैद्यकीय अधिकारी देत आहेत.
बीड (Beed) जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांची संख्या 6 हजार 597 आहे. त्यांना मोफत उपचार व तपासण्या व्हाव्यात या उद्देशाने 14 आयसीटीसी सेंटर आहेत. तर एआरटी सेंटर-2 आहेत. त्यातच सर्व तपासण्या फक्त बीड जिल्हा रुग्णालयातच (hospital) केल्या जातात. जिल्ह्याच्या इतर ठिकाणाहून येत असताना रुग्णांना मोठी अडचण होते. यामुळे अनेक रूग्ण येतं नाहीत. एचआयव्ही बाधित लोकांसाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, एआरटी सेंटर तपासणी व उपचार जिल्हा (District) रुग्णालय, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था कार्यान्वित आहे.
या ठिकाणांहून बाधितांची तपासणी आणि उपचार केले जातात. कोरोना महामारीच्या संकटानंतर काही दिवसांपासून वेळेवर औषधोपचार, रक्त तपासण्या होत नसल्याची ओरड आहे. बीड जिल्हा रुग्णालयात तर चक्क बाहेरून औषधी खरेदी करून पावती आणून देण्याचा सल्ला दिला. तसेच बाहेरून खरेदी केलेल्या औषधाची पावती आणून द्या, पैसे आल्यानंतर आम्ही देऊ, असं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, आमच्याकडे पैसे नाहीत तर आम्ही औषधे आणावे कुठून? असा प्रश्न महिला रुग्णाने उपस्थित केला आहे.
हे देखील पाहा-
बीडमधील आनंदग्राम इन्फंड इंडिया संस्थेत एचआयव्ही बाधित 75 मुले मुली तसेच १० महिला आणि ५ दाम्पत्य राहतात. त्यांना वेळेवर औषध नाही मिळाली तर खूप मोठी अडचणीचा सामना करावा लागतो. लहान मुलांची तर खूप काळजी घ्यावी लागते. जर वेळेवर औषध मिळत नसतील, तर आम्ही काम कस करायचं ? टॉनिक मिळत नाहीत, वेळेवर तपासणी देखील होत नाहीत. औषध मागायला गेलं तर बाहेरून आणा, असे सांगितले जात आहे. सगळ्या मुलांना मी बाहेरून कुठून औषध आणणार? असा प्रश्न प्रकल्प संचालक दत्ता बारगजे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात दत्ता बारगजे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे औषध उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदन देखील दिले होते.
बीड जिल्हा रुग्णालयातील एड्स नियंत्रक व प्रतिबंधक जिल्हा समन्वयक साधना गंगावणे यांना विचारले असता. बीडमध्ये असलेल्या सर्व बाधित रुग्णांसाठी आम्ही वेळेवर औषध उपचार मिळवून देतो, तसेच त्यांचे समुपदेशन देखील करतो. प्रत्येक ६ महिन्याला त्यांच्या रक्ताच्या तपासण्या देखील केल्या जातात असे सांगितले जात आहे. नवीन अपडेट झालेले डोस घेण्यासाठी रूग्ण वेळवर तपासणीला हजर राहत नाहित, कुटुंबातील एकालाच पाठवून गोळ्या औषध घेवून जातात. नवीन ड्रग प्रत्येकाची तपासणी करूनच द्यावी लागते. जुने औषध शासनाकडूनच पुरवठा कमी कमी होेत आहे. यामुळे उपचार करताना अडचण येते. औषधाचा हे कधीकधी तुटवडा भासतो, असे वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ पटेल यांनी सांगितले आहे.
एचआयव्ही बाधितांची औषधांच्या काही काळ तुटवडा निर्माण झाला होता. शासनाकडून पुरवठा कमी झाल्याने अस घडलं होत. त्या संदर्भात औषधांचा तुटवडा भासल्यास सामाजिक संस्थांनी व दानशूर मंडळींनी पुढे येऊन मदत करत त्यांच्याकडे औषध उपलब्ध करून घ्यावेत. अशा सूचना महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीचे संचालक यांनी दिले आहेत. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीतच एड्स बाधित रुग्ण आणि त्यांना सांभाळणार्या संस्थांकडून औषधांचा तुटवडा होत असल्याची ओरड आहे. तर कागदोपत्री जुळवाजुळव करत आम्ही सर्वांना औषध देत आहोत. मात्र औषधांचा तुटवडा भासल्यास सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थांनी पुढे येऊन आम्हाला मदत करावी, असे देखील प्रशासन म्हणत आहे. यावरून चालढकल करून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.