प्रीतम मुंडेंना डावललं; बीड जिल्हा भाजप सरचिटणिसांनी दिला राजीनामा SaamTv
महाराष्ट्र

प्रीतम मुंडेंना डावललं; बीड जिल्हा भाजप सरचिटणिसांनी दिला राजीनामा

खा. प्रीतम मुंडेंना मंत्रीपदापासून डावलल्याच्या निषेधार्थ, भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळेंनी राजीनामा दिला आहे. मुंडे साहेबांच्या वारसांना तोंडात घास आणि मानेत बुक्क्या घालायचं काम पक्षांतर्गत नेते करत असल्याचा आरोप सर्जेराव तांदळे यांनी केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - केंद्रामध्ये गेल्या 7 तारखेला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये, खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव असायला पाहिजे होते. मात्र त्यांचं नाव ऐनवेळी डावलण्यात आलं. याच्या निषेधार्थ, मी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. Beed district BJP general secretary resigns

हे देखील पहा -

या भाजपमध्ये मुंडे साहेबांच्या वारसांना तोंडात घास आणि मानेत बुक्क्या घालायचं पाप पक्षांतर्गत नेते करत आहेत, असा गंभीर आरोप राजीनामा दिल्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, की ज्या मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीला, शेठजी भटजीचा पक्ष म्हणून हिणवलं जात होतं. त्या भारतीय जनता पार्टीला गाव वस्त्यापासून देशात पोहोचवलं. त्यासाठी त्यांनी काम केलं. आज त्यांच्याच वारसांना 'तोंडात घास आणि मानेत बुक्क्या घालण्याचे पाप' भाजप मधील काही पक्षांतर्गत नेते मंडळी करत आहेत.

याच प्रवृत्तीचा निषेध म्हणून मी राजीनामा दिलेला आहे. भविष्यात नेतृत्व जे निर्णय घेईल, त्या निर्णयासोबत आम्ही सामील असणार आहोत. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळावे, ही त्यांची इच्छा नव्हती. तर जिल्ह्यातील अठरापगड जातीची ही इच्छा होती. गेल्या 75 वर्षांपासूनचा अनुशेष या मंत्रीपदामुळे भरून निघेल असं जिल्ह्यातील नागरिकांना वाटत होतं. सध्या मी प्राथमिक स्वरूपात हा राजीनामा दिलेला आहे. भविष्यात मोठे पदाधिकारी देखील राजीनामा देतील. असा विश्वास देखील तांदळे यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून, बीड जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांमधून सोशल मीडियावर, संतापजनक भावना प्रकट केल्या जात असून मनातील खदखद देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच उग्र स्वरूपाचा संताप, बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT