Beed Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: अनैतिक संबंधाचा संशय, २ दिवस डांबून ठेवलं; मारहाणीत तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये पुन्हा खळबळ

Beed Police: बीडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. अनैतिक संबंधातून तरुणीच्या बापाने तरुणाची हत्या केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. या घटनेमुळे बीड पुन्हा हादरले आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे ही घटना घडली. याप्रकरणी संशयित मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आष्टी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील विकास बनसोडे (२५ वर्षे) हा तरुण भाऊसाहेब शिरसागर यांच्याकडे कामाला होता. अनैतिक संबंधातून या तरुणाची मालकाकडूनच हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब शिरसागरला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आष्टी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे कामाला होता. क्षीरसागर यांच्या मुलीसोबत विकासचे प्रेम प्रकरण होते. घराच्या मागील शेतात आपल्या मुलीबरोबर विकास दिसल्याने भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाले होते. त्यांनी विकासला एका खोलीमध्ये डांबून ठेवत दोन दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकासचा जागीच मृत्यू झाला.

विकासचा मृत्यू झाल्याचे कळतात कडा चौकीला कळविण्यात आले. शवविच्छेदनासाठी विकासचा मृतदेह कडा येथील प्रथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला. विकासची हत्या करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. रोज हत्याकांड, मारहाणीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे वारंवर समोर येत आहे. रोज घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जाऊ लागले आहे. त्यामुळे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT