Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

Beed Sugarcane Worker Kidnapped: बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अपहरण करून त्याचा छळ करण्यात आला. अमानुष मारहाण करत त्याच्या तोंडावर लघुशंका केली.

Priya More
  • ऊसतोड मजुराचे अपहरण करून अमानुष मारहाण

  • बीडच्या गेवराई तालुक्यातील धक्कादायक घटना

  • चार दिवस डांबून ठेवत छळ करण्यात आल्याचा आरोप

  • उचल परत करण्याच्या वादातून घडली घटना

योगेश काशिद, बीड

बीडमधील गुन्हेगारी कमी व्हायचे नाव घेत नाहीये. सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडत आहेत. अशातच अशाप्रकारची एक भयंकर घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीसाठी अपहरण करून तब्बल ४ दिवस अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उचल परत का देत नाहीस, या कारणावरून मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या काळात त्यांना डांबून ठेवत बेदम मारहाण केली. रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

देविदास कापसे हे उमापूर येथील रहिवासी असून ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. उचल परत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात आणि संबंधित मुकादमामध्ये वाद झाला होता. त्यानंतर मुकादमाने आपल्या सहकाऱ्यांसह देविदास यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. चार दिवस त्यांना एका ठिकाणी डांबून ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली. शारीरिक अत्याचारासोबतच त्यांचा अपमान करण्यासाठी तोंडात लघुशंका करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक सरपंचांनी मध्यस्थी करत देविदास कापसे यांची सुटका करून त्यांना गावी आणल्याचे सांगण्यात येत आहे.

गंभीर जखमी अवस्थेत देविदास कापसे यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुलाचे अपहरण झाल्यानंतर देविदास यांच्या आईने गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सुरुवातीला त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंब भयभीत झाले असून आरोपी मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अपहरण, मारहाण, बेकायदेशीर कैद तसेच अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT