Beed Crime Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : सुरेश धस सतीश भोसलेचा आका, मारहाण प्रकरणात धसांवरही गुन्हा दाखल करा, ग्रामस्थांची मागणी

Suresh Dhas : ढाकणे बापलेकांना मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बावी गावच्या ग्रामस्थांनी सुरेश धस यांच्यावरही गुन्हा दाखल करुन कारवाई करा अशी मागणी केली आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Crime News : बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला. सतीश भोसले या व्यक्तीने दिलीप आणि महेश ढाकणे या पितापुत्रांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने हा प्रकार समोर आला. अमानूष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेवर दाखल करण्यात आला आहे. आता भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी होत आहे.

मारहाण प्रकरणी ढाकणे पितापुत्रांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सतीश भोसले हा भाजप पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. तो बीडचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचेही म्हटले जात आहे. त्यावरुन आता सुरेश धस यांच्यावरही कारवाई व्हावी असे बावी गावच्या ग्रामस्थांनी म्हटले आहे.

'१९ फेब्रुवारी रोजी सतीश भोसले ढाकणे यांच्या शेतात हरण पकडण्यासाठी गेला होता. हरण पकडण्यासाठी मनाई केल्याने सतीश आणि त्याच्या सहकार्यांनी दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना जबर मारहाण केली. यात दिलीप ढाकणे यांचे दात पडले, तर महेश ढाकणेचा पाय फ्रॅक्चर झाला. या घटनेला पंधरा दिवस होऊन गुन्हा दाखल झाला नाही', अशी प्रतिक्रिया बावी गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

'ज्यावेळेस सोशल माध्यमांवर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा पोलिसांनी याची दखल घेतली. सतीश भोसलेचा आका या प्रकरणावर दबाव टाकत आहे. खोक्या (सतीश भोसले) मी तुझ्या ९९ टक्के नाही तर शंभर टक्के पाठीमागे आहे, असा त्याचा व्हिडीओ आला आहे. सतीश भोसलेचा आका आष्टीचा बोका सुरेश धस आहे. फक्त भोसलेवर नाही तर आका सुरेश धसवरही कारवाई करा' अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT