Beed Crime saam tv
महाराष्ट्र

Beed Crime: वहिनी अंघोळ करत असताना दिराचं बाथरूमध्ये जाऊन संतापजनक कृत्य

Beed News: या प्रकरणी बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद जिरे

Dharur Crime News: वहिनी "तु खूप चांगली दिसतेस, मला आवडतेस" असे म्हणत दिराने वहिनीचा विनयभंग केल्याची घटना बीडमध्ये गडी आहे. विधवा वहिनी आंघोळीसाठी गेलेली असताना दिराने बाथरुमध्ये प्रवेश केला आणि वहिनीशी अश्लील चाळे करत शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणी बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या धारूर तालुक्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. दिरानेच आपल्या विधवा वहिनीचा विनयभंग केला आहे. वहिनी "तू खूप चांगली दिसते, मला आवडतेस" असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित विधवा महिला गावातील शेतवस्तीवर आपल्या 14 वर्षांच्या मुलासोबत राहते. ती आंघोळ करीत असताना तिचा सख्खा दीर बाथरूममध्ये घुसला व तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे करू लागला. यादरम्यान "तू मला खूप आवडतेस, म्हणत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. यावर नकार देताच त्याने तिला धमकीही दिली. (Beed Crime)

यावेळी दिराच्या तावडीतून महिलेने कशीतरी स्वत:ची सुटका केली आणि आरडओरडा केला. यामुळे शेजारील लोक जमा झाले. लोकांचा आवाज ऐकून आरोपी दिराने तेथून पळ काढला. या संतापजनक घटनेमुळे गावात खळबळ उडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बीडच्या दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: ‘या’ 2 राशींना आज मिळणार रखडलेल्या पैशांचा लाभ; १२ राशींचं आजचं भविष्य एका क्लिकवर

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

SCROLL FOR NEXT