Crime New In Beed Saam TV
महाराष्ट्र

Crime New In Beed : चोरट्यांना थांबवताच दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला; भयंकर घटनेत २ महिला गंभीर जखमी

यावेळी चोरट्यांनी महिलांच्या डोक्यात दगडाने हल्ला केला त्यामुळे या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

विनोद जिरे

Beed News : बीडमध्ये चोरट्यांचा मोठा सुळसुळाट सुटला आहे. रात्री घरात फक्त महिला असल्याचा फायदा घेत दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र महिलांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी चोरट्यांनी महिलांच्या डोक्यात दगडाने हल्ला केला त्यामुळे या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. (Crime News)

वडवणी तालुक्यातील देवडी येथे मध्यरात्री ही घटना घडली आहे. दे दोन चोरटे आधी शिवाजी अच्युतराव आगे यांच्या घराच्या गेटचे लॉक तोडून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी घरातील सर्वजण एका रूममध्ये झोपल्याचा अंदाज घेतला आणि दाराला बाहेरून कडी लावली. दुसऱ्या घरात आत प्रवेश करून शोधाशोध घेतली असता त्यांना त्या ठिकाणी काहीच सापडले नाही.

त्यानंतर चोरट्यांनी शेजारील चंद्रकांत नामदेव झाटे यांच्या घरामध्ये प्रवेश केला, यावेळी घरामध्ये पुरुष माणसे कोणीच नाही याचा फायदा घेत घरातील कपाटात शोधाशोध केली. ही गोष्ट घरातील महिलांच्या लक्षात आली. कोणीतरी आपल्या घरात प्रवेश करून कपाट उघडत आहे, असं महिलांना जाणवलं.

यावेळी मनीषा बाळासाहेब झाटे व सुरेखा अण्णासाहेब झाटे या दोन महिलांनी चोरट्यांना चोरी करण्यास विरोध केला. त्यावेळी त्यांना लोखंडी रॉड व दगड डोक्यात घालून जबर मारहाण करण्यात आली. या दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी आरडाओरड होण्याचा अंदाज पाहून चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. दरम्यान यातील दोन्ही जखमी महिलांवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेत चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं नाव अन् चिन्ह; पक्ष-चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

Shocking: मध्यरात्री भयंकर घडलं! ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला जागीच संपवलं, नेमकं काय घडलं?

Vastu Tips For Money: कपाटात पैसे ठेवण्याविषयीच्या 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

SCROLL FOR NEXT