Young Medical Officer Found Dead in Lake Saam
महाराष्ट्र

विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळला डॉक्टरांचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

Young Medical Officer Found Dead in Lake: वडवणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यादव यांचा मृतदेह तलावात आढळला. गणेश विसर्जनाच्या दिवशी ते सकाळपासून बेपत्ता होते.

Bhagyashree Kamble

  • वडवणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यादव यांचा मृतदेह तलावात आढळला.

  • गणेश विसर्जनाच्या दिवशी ते सकाळपासून बेपत्ता होते.

  • मृत्यू आत्महत्या की घातपात, याबाबत संशय असून पोलीस तपास करत आहेत.

  • या घटनेमुळे आरोग्य विभाग व स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बीडच्या वडवणी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यादव यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह गणेश विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळून आला. यामुळे परिसरात काहीवेळ खळबळ उडाली होती. हा घातपात आहे की आत्महत्या? याबाबत गावात चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

डॉ. शुभम यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते कार्यरत होते. शनिवारी राज्यात विसर्जन सोहळा पार पडला. भक्तीभावाने भक्तांनी गणरायाला निरोप दिला. मात्र, बीडच्या वडवणीत एक भयंकर प्रकार उघडकीस आला. त्यांचा मृतदेह थेट तलावात आढळला.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शुभम यादव (वय अंदाजे २५), हे मुळचे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील रहिवासी आहेत. २०२२ ते २०२३ पासून वडवणी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते. काल, गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून ते बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती.

नातेवाईकांनी त्यांना गावभर शोधलं. मात्र, डॉक्टर काही सापडले नाहीत. त्यानंतर त्यांचा थेट मृतदेह शहरातील तलावात आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. डॉ. यादव यांची हत्या आहे की आत्महत्या? या दिशेनं सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले.

शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनातही शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टॅरिफनंतर भारताला आणखी एक धक्का, अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांवर थेट परिणाम

Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

SCROLL FOR NEXT