Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

तुझ्या विरोधात महिलेची तक्रार आहे, अटक करीन; पोलिसाच्या नावाने दिली विद्यार्थ्याला धमकी

तुझ्या विरोधात महिलेची तक्रार आहे, अटक करीन; पोलिसाच्या नावाने दिली विद्यार्थ्याला धमकी

विनोद जिरे

बीड : तुझ्या विरोधात महिलेची तक्रार आहे...तुला अटक करेन...असं म्हणत पोलिसांच्या नावाने भलत्यानेच विद्यार्थ्याला धमकी दिली. हा खळबळजनक प्रकार (Beed) बीडच्या गेवराईमध्ये उघडकीस आला. योगेश नामदेव नागरे (वय 27, रा. संगमजळगाव, ता. गेवराई) असे (Student) विद्यार्थी असणाऱ्या तक्रारदार तरुणाचे नाव आहे. (Letest Marathi News)

योगेश नागरे याने दिलेल्या फिर्यादीवरून 1 नोव्हेंबरला सकाळी पावणेदहा वाजता फेसबुकवरून एका अनोळखी महिलेने मी औरंगाबादच्या (Aurangabad) बजाजनगरमध्ये राहत असून, मोबाईल क्रमांकाची मागणी केली. योगेशने मोबाईल क्रमांक दिल्यावर दुपारी पावणे एक वाजता अनोळखी पुरुषाने फोन करुन तुम्ही सकाळी (Crime News) नंबर दिला होता. आम्ही तुळजापूरला दर्शनासाठी गेलो होतो. मांजरसुंबा येथे डिझेल भरले. मात्र, फोन पेची मर्यादा संपल्याने पैसे देता येत नाहीत. तुम्ही 700 रुपये पाठवा. यावर योगेशला हा बनावट कॉल असल्याचा संशय आल्याने त्याने प्रतिसाद दिला नाही.

पुन्‍हा कॉल करत दिली धमकी

त्यानंतर दोन तासांनी एका अनोळखी क्रमांकावरुन योगेशला कॉल आला. समोरील व्यक्तीने मी सायबर पोलीस ठाणे बीड येथून बोलत असल्‍याचे सांगून एका महिलेशी चॅटिंग केल्याने तुझ्याविरुद्ध तक्रार आहे. असे सांगत अटकेची भीती घातली. दरम्यान या दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटाचे टायर्स दिसतात, शरीर सुटतच चाललंय? पाण्यात मिसळा '१' पदार्थ, बाबा रामदेव सांगतात झरझर घटेल वजन

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

'द लायन किंग'ला Mahavatar Narsimha पछाडणार; रक्षाबंधनला मोडले अनेक रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा किती?

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

ITR Filling 2025: पहिल्यांदा आयटीआर भरताय? नो टेन्शन, स्टेप बाय स्टेट प्रोसेस जाणून घ्या, आयकर विभागाने जारी केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT