Beed Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : रक्षकच झाला भक्षक! महिला दिनी पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार, बीड हादरलं

Beed News : पुण्याहून बीडला बसने येणाऱ्या महिलेवर पोलीस कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. जागतिक महिला दिनी हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Crime News : पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. यावरुन राज्यभरात संतापाची लाट पसरली. हे प्रकरण ताजं असतानाच बीडमध्ये आणखी एका अत्याचाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक महिला दिनीच एका पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा पोलीस ठाण्याचे अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले आणि पाटोदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही बसने महिला पुण्याहून बीडला येत होती. तिला बसमधून उतवरुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

पीडित महिला काही कारणास्तव पाटोदा पोलीस ठाण्यात येत होती. त्याच दरम्यान ती अमलदार उद्धव गडकर यांच्या संपर्कात आली. त्यांच्यात फोन नंबरची देवाणघेवाण झाली. संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण चोरीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर अत्याचार सुरु ठेवले.

फिर्यादी महिलेने ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडल्याचे पोलिसांना सांगितले. पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन महिलेने पोलीस निरीक्षक यांच्या समोर तक्रार दाखल केली. कारवाईला सुरुवात होईपर्यंत ती पोलीस ठाण्यात बसून होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच अमलदार गडकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

MNS Deepotsav : मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ | VIDEO

Leopard: बिबट्यांची संख्या 1200 वर; राज्य सरकार बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार?

Silver Rate: दिवाळीच्या पहिल्या दिवशी चांदीच्या दरवाढीला ब्रेक; ४००० रुपयांची घसरण; वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT