Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: पेपर सुटण्याची पाहत होता वाट; विद्यार्थीनी बाहेर येताच केले धक्‍कादायक कृत्‍य, आईलाही केली शिवीगाळ

पेपर सुटण्याची पाहत होता वाट; विद्यार्थीनी बाहेर येताच केले धक्‍कादायक कृत्‍य, आईलाही केली शिवीगाळ

विनोद जिरे

बीड : दहावीचा पेपर देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थीनीचा हात पकडून 'चल माझ्यासोबत, तुझ्या आई- वडिलांना लग्न करून द्या म्हणू..' असे म्हणत दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) शहरात उघडकीस आली. तसेच आईलाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी आरोपी अटक केली आहे. (Live Marathi News)

पीडिता व आरोपी एकाच गल्लीत राहत असून एकाच ठिकाणी शिक्षणही घेत आहेत. पीडिता ही दहावीच्या परिक्षेसाठी घराबाहेर पडली. यावेळी आरोपी तरुण तिचा पाठलाग करत मागे आला. दुपारी पेपर संपल्यानंतर ती केंद्रातून बाहेर आली. यावेळी आरोपी देखील बाहेर उभाच होता. त्याने थेट तिचा हात पकडत म्हणाला 'चल माझ्यासोबत..आपण तुझ्या घरी जावू आणि तुझ्या आई-वडिलांना लग्न करून द्या, असे म्हणू'. असे म्हणत तिच्याशी हुज्जत घालू लागला.

आईला दिली धमकी

पीडितेने झटका मारून त्याच्या हातातून हात सोडला. नंतर ती घराच्या दिशेने जात असतानाही तो मागेच आला. याचवेळी पीडितेची आई तेथे आली. तिने आरोपीला जाब विचारताच त्याने त्यांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने आई-वडिलांसह बीड शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. यावरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बार्शी - सोलापूर मार्गांवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात

डोळ्यांच्या 'या' बदलाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

SCROLL FOR NEXT