Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : संतापजनक..दिव्यांग दाम्पत्याच्या मुलीवर घरात घुसून बळजबरी अत्याचार; नंतर पीडित कुटुंबाला गावसोडून जाण्याचा दबाव

संतापजनक..दिव्यांग दाम्पत्याच्या मुलीवर घरात घुसून बळजबरी अत्याचार; नंतर पीडित कुटुंबाला गावसोडून जाण्याचा दबाव

विनोद जिरे

बीड : बीडमध्‍ये दिव्यांग दांपत्याच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २४ वर्षीय नराधम तरुणाने घरात घुसून बळजबरीने (Beed) अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे हा नराधम तरुण एव्हढ्यावरच थांबला नाही; तर त्याने सतत बळजबरीने अत्याचार केल्याने पिडीता ही ७ महिन्याची गर्भवती राहिली. या गर्भवती पीडितेची बीड- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील संभाजीनगर जिल्ह्यात येत असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये डिलिव्हरी करण्यात आली. (Tajya Batmya)

सदर संतापजनक प्रकार बीडपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांमध्ये घडला आहे. यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात (Crime News) करणारी टोळी ऍक्टिव्ह झाल्याचं उघडकीस आले आहे. याप्रकरणी नराधम आरोपी रणजित शिवदास शेंडगे याच्यासह त्याला साथ देणारा भाऊ पवन शिवदास शेंडगे, जालिंदर खामकर, योगेश शेंडगे यासह ९ जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार, पोस्कोसह अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला.

दबाव टाकून सोडायला लावले गाव

विशेष म्हणजे हा नराधम आरोपी आणि त्याचे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत या पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला गावातून पुण्याला जाऊन रहा, असा दबाव देखील टाकला. त्यानंतर नराधम आरोपी पीडित कुटुंबाला पुणे येथे सोडून आले. दरम्यान हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या मामाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडीतेसह तिचे आई वडील गायब असल्याची तक्रार केली. तर पीडितेच्या चुलत भावाने आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराची माहिती पत्राद्वारे राज्य महिला आयोगाकडे केली. यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. दबाव टाकून गावातून बाहेर नेऊन सोडलेल्या पीडित कुटुंबाला चाईल्ड लाईनचे सदस्य तत्त्वशील कांबळे यांच्यासह पोलिसांनी १५ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर शोधण्यास यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

Pune To Kolhapur: पुण्यापासून कोल्हापूरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग आणि पर्याय कोणते?

SCROLL FOR NEXT