Ashti Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : तिच्यासाठी 'तो' तुरुंगात गेला अन् जामिनावर बाहेर येताच पुन्हा...

हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे.

विनोद जिरे

बीड - एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय तरुणास तुरुंगवारी घडली. मात्र जामिनावर सुटका झाल्यावर जिच्यामुळे कारागृहात राहावे लागले, तिला घेऊन त्याने पुन्हा पलायन केले. हा प्रकार बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. (Beed Latest Crime News)

तेजस असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तेजसवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी झाली. मात्र जामिनावर सुटल्यावर त्याच मुलीला त्याने पुन्हा एकदा फूस लावून पळवल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बीडच्या (Beed) आष्टी ठाण्यात तेजसवर पुन्हा एकदा अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने आष्टी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात मुलींना फुस लावून पळवून नेल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळं पालकांमध्ये एक प्रकारे मुलींच्या असुरक्षिततेची भीती पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा घटना रोखल्या जाव्यात, यासाठी प्रशासनाने उपायोजना आणि कारवाया कराव्यात अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

SCROLL FOR NEXT