Satish Bhosale khokya bhai Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale : खोक्या बीडहून प्रयागराजला पोहचलाच कसा? सतीश भोसलेला कुणी आश्रय दिला?

Beed Crime : भाजप आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसले अखेर जेरबंद झाला. मात्र खोक्या बीड ते प्रयागराज कसा पोहचला? खोक्याने पोलिसांना गुंगारा कसा दिला? याबरोबरच 6 दिवस खोक्याने कुठे आणि कसा प्रवास केला? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

भाजप आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय असेलल्या खोक्या भोसले प्रयागराजमधून जेरबंद केला. त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. मात्र बीड जिल्ह्यातील शिरुर ते प्रयागराज हा प्रवास खोक्याने कसा केला आणि 6 दिवस खोक्या पोलिसांना कसा गुंगारा देत होता? त्याची माहिती समोर आलीय.

सहा दिवस खोक्या होता कुठे ?

- दुसरा गुन्हा दाखल झाल्यावर खोक्याने शिरुरमधून पुण्याच्या दिशेने पळ काढला

- पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी 2 दिवस मुक्काम

- पुण्यातून शिरुर कासारच्या बॉर्डरवर माध्यमांना प्रतिक्रीया

- तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरमध्ये मुक्काम

- अहिल्यानगरहून संभाजीनगरमध्ये दाखल

- संभाजीनगरमध्ये मुक्काम करुन ट्रॅव्हल्सने प्रयागराजला रवाना

- विमानाने पलायन करण्याच्या तयारीतील खोक्याला प्रयागराजमध्ये बेड्या

अमानुष मारहाण, पैशांची उधळपट्टी, हेलिकॉप्टरमधून केलेला माज आणि वन्यजीवांची कत्तल यामुळे खोक्या अडचणीत आला. याच कारनाम्यामुळे खोक्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता खोक्या आणि त्याच्या बोक्याला कोणत्याही परिस्थितीत ठोकणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.

खोक्या 6 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता.. दरम्यान तो पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर ते प्रयागराज हा प्रवास कुणाच्या आशीर्वादाने करत होता? फरार असलेला खोक्या माध्यमांपर्यंत कसा पोहचला? खोक्याला वाचवणारा आणि तो फरार असतानाही दिशा दाखवणारा आका कोण? याचा सखोल तपास होणार का? आणि खोक्याच्या आकालाही जेरबंद केलं जाणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT