Beed Latest News : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस असलेले सर्जेराव तांदळे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा प्रकार, अहमदनगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर घडलाय.
27 डिसेंबर 2022 रोजी रात्री तीन व्यक्ती सर्जेराव तांदळे यांना जीवे मारण्याबाबत चर्चा करत होते. ही चर्चा तांदळे यांच्या एका समर्थकाने ऐकली आणि त्यांनतर त्यांनी हा प्रकार तांदळे यांना सांगितला. हे ऐकून घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याने बीड पोलिसात तक्रार करण्यात आली असून बीड जिल्हा पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहेत.
भाजप नेते सर्जेराव तांदळे हे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जातात. 27 डिसेंबर 2022 रोजी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान नगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर बसून अज्ञात 3 व्यक्ती सर्जेराव तांदळे यांना जिवे मारण्याचा कट रचत होते.
या तीन व्यक्तीपैकी दोघेजन काळ्यासावळ्या रंगाचे आणि मजबूत बांध्याचे तर तिसरा व्यक्ती मध्यम बांध्याचा होता. भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांना कुठे व कसे मारायचे, ही त्यांची चर्चा बाजूलाच बसलेल्या एका तांदळे समर्थकाने ऐकली. त्याने याची माहिती सर्जेराव तांदळे यांना दिली.
या खळबळजनक प्रकाराने तांदळे कुटुंबीय भयभीत झाले असून बीड येथील भाजपाच्या टीमने तात्काळ पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती देत तक्रार दिलीय. दरम्यान पोलीस अधिक्षकांनी याची गांभीर्याने दखल घेत जीवे मारण्याचा कट रचणार्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केलाय.
ज्या हॉटेलमध्ये कट रचला जात होता, तेथील सिसिटिव्ही फुटेज तपासले जात आहेत. दरम्यान पोलिसांनी भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांना शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.