Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडमध्ये मुलांकडून भीक मागायला लावणाऱ्या ४ महिलांवर कारवाई; बालकामगार ठेवणाऱ्या २ व्यापाऱ्यांवरही गुन्हा

Beed Crime News : अनेक ठिकाणी लहान मुलांना हॉटेल, चहाची टपरी, यासह वेगवेगळ्या ठिकाणी कामावर ठेवले जात असते. यासाठी राज्यात पोलिस प्रशासनाकडून ऑपरेशन मुस्कान मोहिम राज्यभरात राबविली जात आहे.

विनोद जिरे

बीड : अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणे हा गुन्हा मानला जातो. मात्र बीडमध्ये व्यापाऱ्यांनी अल्पवयीन मुलांना कामाला ठेवल्याचा आणि काही महिलांकडून भीक मागण्यासाठी वापर केला जात होता. त्यानुसार अल्पवयीन बालकांचा भीक मागण्यासाठी वापर करणाऱ्या ४ महिलांसह दुकानावर अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्या व्यापाऱ्याला बीड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनेक ठिकाणी लहान मुलांना हॉटेल, चहाची टपरी, यासह वेगवेगळ्या ठिकाणी कामावर ठेवले जात असते. यासाठी राज्यात पोलिस प्रशासनाकडून ऑपरेशन मुस्कान मोहिम राज्यभरात राबविली जात आहे. या अंतर्गत बालकामगारांची मुक्तता, हरवलेल्या मुलांचा शोध, पीडित मुलांचा शोध आता पोलीस प्रशासनाकडून चालू आहे. बीड पोलिसांकडून देखील हि मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत बीडमध्ये अल्पवयीन मुलांकडून भीक मागणे व बालकामगार आढळून आले आहेत. 

दरम्यान बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या एपीआय वर्षा व्हगाडे व सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे. बीड शहरात ५ लहान मुलांचा भिक मागण्यासाठी वापर करणाऱ्या महिलांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलिसांत सोनल लोढे, काशाबाई भोसले, जालनबाई काळे, सीमा गायकवाड या ४ महिलांवर गुन्हा नोंद केला आहे. 

दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल 

त्याचप्रमाणे या मोहिमेअंतर्गत बीड शहर पोलिसांनी शहरातील भाजी मंडई परिसरातून दोन बालकामगारांची सुटका केली आहे. भाजी मंडईमध्ये हे बालकामगार व्यापाऱ्यांकडे कमला होते. लहान मुलांना कामावर ठेवणाऱ्या जुबेर शेख व संजय खंडागळे या २ व्यापाऱ्यांवर गुन्हा नोंद केला आहे. बीड शहरात या दोन्ही प्रकरणांचा आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

SCROLL FOR NEXT