Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : प्रवासादरम्यान एसी लावण्यावरून वाद; ट्रॅव्हल्स मालक व ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी

Beed News : बालाजी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातच रविवारी साडेसात वाजता वाद झाला. यामध्ये दोघांकडूनही एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना एसी लावण्यावरून प्रवाशी व चालकांमध्ये वाद झाला होता. दरम्यान या वादातूनच प्रवासी असलेल्या ग्राहकाने ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात येऊन थेट मारहाण करण्यात आल्याचा प्रकार बीडच्या सिरसाळा येथे समोर आला आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलिसांनी लागलीच मध्यस्थी करत वाद मिटविला आहे. 

बीडच्या सिरसाळा येथील श्री बालाजी ट्रॅव्हल्समध्ये स्थानिक प्रवासी बंडु थोरात व मालक यांच्या हा वाद झाला आहे. दरम्यान थोरात यांचा ट्रॅव्हल्सच्या चालकासोबत एसी लावण्याच्या कारणावरून सुरुवातीला वाद झाला होता. यानंतर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात घुसून बंडू थोरात आणि इतर लोकांनी सुरुवातीला दादागिरी करत मारहाण केली. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. 

एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण 

ट्रॅव्हल्स मालक बालाजी जावडे आणि प्रवासी बंडू थोरात यांच्यामध्ये श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातच रविवारी साडेसात वाजता वाद झाला. यामध्ये दोघांकडूनही एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. ही संपूर्ण घटना बालाजी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यात कार्यालयात असलेल्या एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे कॅमेरात दिसून येत आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान वाद सुरू असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी सोडवा- सोडव केली. पोलीस दाखल झाल्यानंतर देखील एकमेकांना मारहाण सुरूच होती. ट्रॅव्हल्स मालक बालाजी जावडे यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी फोनवरून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या 'सैयारा' आणि 'सन ऑफ सरदार २'ची कमाई

वाल्मीक कराडच्या अटकेचा VIDEO गोट्या गीतेने केला शेअर, पुण्याहून पोलिसांचा पाठलाग करत...

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आजपासून दोन दिवस वाशिमच्या दौऱ्यावर

Facebook: फेसबुकवरील तुमचे फोटो कुणीतरी चोरतंय? तुमच्या डेटाचा होतोय गैरवापर?

Tomato Price: संभाजीनगरमधील शेतकऱ्याला लागली लॉटरी, १ किलो टॉमेटोला मिळाला ३०६ रुपये भाव; झटक्यात कमावले लाखभर रुपये

SCROLL FOR NEXT