Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! लग्न लावून मुलीला सासरी पाठवलं; दुसऱ्याच दिवशी आईने घेतला गळफास

सुवर्णा सुनील जाधव (वय 45) असे मयत महिलेचे नाव आहे.

विनोद जिरे

बीड : आपल्या लाडक्या मुलीचे थाटात लग्न (Marriage) लावले, पाणवलेल्या डोळ्यांनी तिला निरोप देत पाठवणी केली, मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (27 मे) दुपारच्या सुमारास बीड (Beed) शहरातील अंबिका चौक परिसरात घडली आहे. सुवर्णा सुनील जाधव (वय 45) असे मयत महिलेचे नाव आहे. (Beed Latest Crime News)

सुवर्णा यांच्या मुलीचा लग्नसोहळा 26 मे रोजी मोठ्या थाटात पार पडला. सायंकाळी मुलीची सासरी पाठवणी केली. त्यानंतर शुक्रवारी (27 मे) मयत सुवर्णा यांनी घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच, बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

सुवर्णा यांनी नेमकी आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान मयत जाधव कुटुंबातील कोणीही पोलीस ठाण्यात न गेल्यानं, अद्यापही आत्महत्याची नोंद ठाण्यात झाली नसून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi Son Engagement:७ वर्षांचं रिलेशनशिप, आता साखरपुडा, प्रियांका गांधींच्या सुनबाई आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याने पिंपरी चिंचवड शहरात भाजप शिवसेना युती तुटली : खासदार श्रीरंग बारणे

VIDEO : तिकीट कापलं, राडा घातला, संतापानं बीपी वाढला; कुणी पेट्रोल आणलं...संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक

Ajwain Leaf Pakoda: ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी कशी बनवायची?

Nagpur: नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले, उमेदवारी न मिळाल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांचा राडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT