बीड कि बिहार? भर चौकात भाजी विक्रेत्या महिलेला शरीरसुखाची मागणी!  SaamTvNews
महाराष्ट्र

बीड कि बिहार? भर चौकात भाजी विक्रेत्या महिलेला शरीरसुखाची मागणी!

"तुझ्या पतीला पैसे दिले आहेत, तो पैसे परत करत नाही, तू पैसे देत नाही, तू माझ्यासोबत चल" असे म्हणत शारीरिक सुखाची मागणी केली आहे. याला विरोध केला असता आरोपी सिताराम बडे याने, पीडितेला मारायला सुरुवात केली.

विनोद जिरे

बीड : भाजी विक्री करणाऱ्या महिलेला शरीर सुखाची मागणी केल्यानंतर, त्याला विरोध करणाऱ्या पीडितेला भर चौकात, तरुणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीय. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनतर ही धक्कादायक उघडकीस आली आहे. या प्रकरणात तक्रार, गुन्हा दाखल होऊनही पोलीस कारवाई करत नाहीत. मला न्याय नाही मिळाला तर, आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून कायदा सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असून पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हे देखील पहा :

बीड शहरातील मित्र नगर चौकात भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या पीडित महिलेला, आरोपी सिताराम बडे याने "तुझ्या पतीला पैसे दिले आहेत, तो पैसे परत करत नाही, तू पैसे देत नाही, तू माझ्यासोबत चल" असे म्हणत शारीरिक सुखाची मागणी केली आहे. याला विरोध केला असता आरोपी सिताराम बडे याने, पीडितेला मारायला सुरुवात केली. अंगावरील कपडे पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भर चौकात घडलेल्या घटनेत मात्र पोलिसांनी या प्रकरणात थातुरमातुर कारवाई केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ही घटना दि 11 सप्टेंबर रोजीची आहे, मात्र मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झालेत.

इतक्या गंभीर प्रकरणात पोलिस आरोपींना पाठीशी घालत आहेत. याबाबत संताप व्यक्त केला जात असून या गंभीर प्रकरणात शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना फोनवरून संपर्क केला असता, त्यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल असून आरोपीवर कारवाई केली आहे, असं सांगितलं. मात्र, कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळं याप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून पीडितेला न्याय द्या अशी मागणी होत आहे. न्याय नाही मिळाला तर आत्मदहनाचा इशारा पीडित महिलेने थेट जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT